Dhananjay Munde  
महाराष्ट्र

Beed Politics: धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार? रणजीत कासलेंच्या आरोपानंतर राजकारण तापलं

Dhananjay Munde : निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांना मुंडेंनी १० लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

बीडमधील निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी धनंजय मुडेंवर गंभीर आरोप केलेत. मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या बँक अकाऊंटवर 10 लाख रुपये टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे बीडमधील राजकारण तापलंय. विधानसभा निवडणूक कशी झाली? प्रशासनाचा कसा गैरवापर झाला याची चौकशी न्यायालयाकडून करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाचे विधानसभा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केलीय.

गेल्या काही दिवसांपासून बीडचं नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून गुंडगिरी झाली होती. नंतर देशमुख हत्याकांड आणि आता निवडणुकीच्या काळात पोलीस निरीक्षकाला पैसे दिल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे बीड पु्न्हा चर्चेत आले आहे. निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय.

एकट्या रणजीत कासलेला १० लाख दिले असतील तर बाकीच्यांना किती दिले, असा सवालही त्यांनी तक्रार करताना उपस्थित केलाय. कासलेंना इतके पैसे दिले आहेत तर इतरांना किती पैसे दिले असतील? परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा कशा रितीने गैरवापर झाला हे समोर येत आल्याचं देखील देशमुख म्हणालेत. यासर्व प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचं देशमुख यांनी सांगितले.

परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनिमित्त धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख हे एकमेंकाविरोधात उभे होते. या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला. आता कासले यांच्या आरोपानंतर देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ते न्यायालयाचा दरवाजा ठोकणार आहेत. दरम्यान याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT