बीड : 10 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला! SaamTvNews
महाराष्ट्र

बीड : 10 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला!

विशेष पोलीस महानिरीक्षक बीडमध्ये असताना कारवाई झाल्यानं पोलीस दलात खळबळ

विनोद जिरे

बीड : बीड एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. काल तलाठ्यावर कारवाई केली असतानाच आज पोलीस (Police) कर्मचाऱ्याला 10 हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहात पकडले आहे. तेजस वाहुळे असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बीडच्या (Beed) धारुर पोलीस पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारास गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

हे देखील पहा :

तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्विकारतांना, आज केज (Kej) तालुक्यातील आडस परिसरात, बीड एसीबीच्या टिमने रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक बीड जिल्ह्यात असताना, ही कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंडेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

Weight Loss Drink: लिंबू पाणी की कोमट पाणी; वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Maharashtra News Live Update: भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT