Beed News Saam TV
महाराष्ट्र

बापरे! पाणी चोरण्यासाठी त्याने तब्बल 150 मोटारी लावल्या; 10 गावं संकटात

Beed Latest Marathi News : मुळीकवस्ती गाव परिसरातील जवळपास 10 गावांवर पाणी संकट घोंगावत आहे

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असताना, दुसरीकडे मात्र भरदिवसा जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारीने तलावातील पाणी उपसा केला जात आहे. हा धक्कादायक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील मुळीकवस्ती परिसरात उघडकीस आलाय. यामुळे गाव परिसरातील जवळपास 10 गावांवर पाणी पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. (Beed Latest Marathi News)

पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका परिसरात मुळीकवस्ती आहे. या मुळीकवस्ती लगतचं तलाव (लघु प्रकल्प) आहे. या तलावावर गाव परिसरातील नागरिकांनी जवळपास 150 ते 200 विद्युत मोटारी बसवले आहेत. विशेष म्हणजे या सर्व मोटारी जवळजवळ असून मोटारीच्या पाईपच्या देखील रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व मोटारी आकडा टाकून म्हणजेच वीजचोरी करून सुरू असून याकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान भरदिवसा एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरी आणि पाणी चोरी होत असताना, प्रशासन डोळेझाकपणा करत असल्याने, या मुळीकवस्ती गाव परिसरातील जवळपास 10 गावांवर पाणी संकट घोंगावत आहे. त्याचबरोबर वीज चोरीमुळे देखील लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT