Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घाटनांदुर गाव बंद; मतदान प्रक्रियेदरम्यानची घटना

Beed news : विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान वादावादी, मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात घडली

विनोद जिरे

बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे परळी मतदारसंघातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते माधव जाधव यांना काल परळीत मारहाण झाली होती. याच्या निषेधार्थ आता बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर गावात बंद पूकारण्यात आला आहे. यामुळे गावातील व्यवसायिकांनी आपल्या दुकाना बंद ठेवले असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) काल मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान वादावादी, मारहाण झाल्याच्या घटना घडल्या. अशीच एक घटना (Beed News) बीड जिल्ह्यात घडली असून परळीत शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण झाली. तर मारहाणीनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनसह मतदान केंद्रातील सामान अन् काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान मारहाणीच्या निषेधार्थ आज घटनांदूर गावात बंद पाडण्यात आला आहे. 

माधव जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून काल चापट मारून अन् गचांडी देऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटनांदुर येथील ईव्हीएम मशीनची तोडफोड केली. त्याचबरोबर मतदान केंद्रातील सामानांची देखील तोडफोड केली होती. त्यानंतर गावात राहणाऱ्या बन्सी शिरसाट यांच्या गाडीसह अन्य गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान या सर्व घटनेनंतर घाटनांदुर गावात तणावपूर्ण वातावरण असून आज घाटनांदुर बंदची हाक देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT