Parali News Saam tv
महाराष्ट्र

Parali News : शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला बेदम मारहाण; बीडच्या परळीतील घटना

Beed News : बीड जिल्ह्यातील परळी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुळात गरिबाला शासनाने कमी दरात जेवण मिळावे; यासाठी राज्यात ठिकठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत

विनोद जिरे

बीड : बीडच्या परळीतून पुन्हा एकदा धक्कादायकाने संतापजनक बातमी समोर आली आहे. परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका शिवभोजन केंद्रावर जेवण करण्यासाठी गेलेल्या दिव्यांग तरुणाला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण झाल्याच्या या प्रकारचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

बीड जिल्ह्यातील परळी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुळात गरिबाला शासनाने कमी दरात जेवण मिळावे; यासाठी राज्यात ठिकठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी जेवण करण्यासाठी बरेचजण येत असतात. त्यानुसार हाताने दिव्यांग असणारा एक तरुण जेवण करण्यासाठी परळीतील स्टेशन परिसरातील शिवभोजन केंद्रात गेला होता. 

दरम्यान या शिव भोजन केंद्राचा मालक आचार्य व त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण तयार नाही. असे म्हणत या दिव्यांगाला बाहेर काढले व लाथा बुक्क्यानी मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका रहदारी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून आता तो व्हिडिओ वायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी 

दिव्यांग तरुणाला अमानुष मारहानीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद होऊन तो व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान अशा पद्धतीने शिवभोजन केंद्रात जेवण मागण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला मारहाणीची घटना घडल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT