Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: न्यायासाठी महिलेला स्मशानभूमीत आंदोलन करावं लागतं, ही जिल्ह्यासाठी काळिमा फासणारी घटना - पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे या तारामती साळुंके यांच्या उपोषणावरून आक्रमक झाल्या आहेत

विनोद जिरे

बीड : न्यायाची मागणी घेऊन एका महिलेला स्मशानभूमीत आंदोलन करावं लागत आहे. ही जिल्ह्यासाठी काळिमा फासणारी घटना आहे, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे या तारामती साळुंके यांच्या उपोषणावरून आक्रमक झाल्या आहेत (Beed Pankaja Munde Reaction On Woman Protest At Cemetery).

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, शेतकरी आत्महत्या कुठलीही दुर्दैवी असते. एका महिलेने पतीच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत आंदोलन (Protest) करावं. हे जिल्ह्यासाठी काळीमा फासणारी घटना आहे. जिल्ह्याच्या सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी यात तात्काळ लक्ष घालावं. नाही तर यात आमच्या पद्धतीने आम्ही लक्ष घालू. असा इशारा भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

पतीचा ज्या ठिकाणी अंत्यविधी केला त्याच स्मशानभूमीत महिलेला उपोषण करण्याची वेळ

बीड जिल्हा प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आणणारा संतापजनक प्रकार बीडमध्ये समोर आलाय. न्यायाची मागणी घेऊन एका महिलेला चक्क, ज्या ठिकाणी मावेजा पायी आत्मदहन केलेल्या पतीचा अंत्यविधी केला, त्याच स्मशानभूमीत बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे. तारामती साळुंके नावाच्या महिलेने यांनी काल ज्यावेळी देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात होता, त्याच दिवसपासून आपल्या आत्मदहन केलेल्या पतीचा अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत, न्यायाची मागणी घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT