Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : एकतर्फी प्रेमाचा करुण अंत; आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

Beed : आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट आणि एका मुली सोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच त्याच्या बाबतीत घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे

विनोद जिरे

बीड : काही तरुण- तरुणी एकतर्फी प्रेम करत असतात. या प्रेमात नकार मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलत असतात. अशाच प्रकारे बीडच्या चिंचवडगाव गावातील २८ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुणाने जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. 

बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव येथील उमेश शेंडगे पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनेकदा एकतर्फी प्रेमातून मुलीने नकार दिल्यास तिच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःचे जीवन संपविले आहे. यात उमेश याचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याचे हे प्रेम एकतर्फीच होते. उमेश याने या प्रेमातून टोकाचे पाऊल उचलले आहे. 

मुलीसोबतचा फोटोही केला शेअर 

शेतात जाऊन उमेशने झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. दरम्यान त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट आणि एका मुली सोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच त्याच्या बाबतीत घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. मात्र या घटनेने खळबळ उडाली असून एकतर्फी प्रेमातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांना व मित्र परिवाराला धक्का बसला आहे. 

सोशल मीडियावर भावनिक पोस्ट 
उमेशने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर  एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हि पोस्ट लिहिताना त्याने 'माझ्या आयुष्यात पाच/ सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे.. असं म्हणून पोस्ट लिहायला सुरुवात केली आहे. यानंतर त्याने घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती लिहिली आहे. तर समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये अनेकांच्या प्रकरणाचा उल्लेख करत खळबळ उडून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माय-लेकीची निर्घृण हत्या,जवळच्या व्यक्तीनेच दगा दिला; ११ दिवसांनी उलगडलं हत्येचे गूढ

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा थरार

Saree Draping Style: लग्नसराईसाठी साडी ड्रेपिंगच्या नविन आयडिया शोधताय? मग या पद्धतीने साडी नक्की नेसून मिळेल ग्लॅमरस लूक

Big Boss फेम अन् टीव्ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लालभडक लेहेंग्यातील Photo व्हायरल

Maharashtra Politics: भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना|VIDEO

SCROLL FOR NEXT