Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: तरुणाचे मोबाईल टावरवर चढून आंदोलन; गावात समस्‍यांनी त्रस्‍त

तरुणाचे मोबाईल टावरवर चढून आंदोलन; गावात समस्‍यांनी त्रस्‍त

विनोद जिरे

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावच्या अशोक शिवाजीराव माने या तरुणाने बीड (Beed) शहरातील बालेपीर भागात असलेल्या टावरवर चढून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. (Breaking Marathi News)

आष्टी तालुक्यातील धानोरा ते वाहिरा या रस्त्याला नवीन मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर या परिसरात असलेल्या वस्तीवरचे रस्ते दुरुस्त करून गावात असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी या तरुणांनी केली असून गेल्या एक तासापासून हा तरुण बीड शहरातल्या बालेपिर भागातल्या एका टॉवरवर चढून बसला आहे.

प्रशासनाची धावपळ

तासाभरापासून सुरू असलेल्‍या आंदोलनामुळे नागरीकांची गर्दी जमली आहे. दरम्यान यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून टॉवर परिसरात पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवान तैनात झाले आहेत. आंदोलन करत असलेल्‍या तरुणाला खाली उतरविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT