Beed Accident saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News: वहिनीचा हात धरला म्हणून दिराने काढला काटा, बीडमधील दुचाकी अपघाताला धक्कादायक वळण

Beed News: परळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी आणि पीकअपमध्ये झालेल्या अपघाताला वेगळं वळण मिळालंय.

विनोद जिरे

Beed Crime News: बीडच्या परळी येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी आणि पीकअपमध्ये झालेल्या अपघाताला वेगळं वळण मिळालंय. मयत संपत्ती भारत पारवे वय 23 रा. डाबी ता. परळी याचा काल अपघातात मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात नसून घातपात घडवून आणला असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.

मयत संपत्ती भारत पारवे याने त्यांच्या भावकितील एका विवाहितेचा हात धरून तिची छेड काढली होती. यानंतर त्या महिलेच्या दिराने याचा राग मनात धरून संपत्ती याचा अपघात घडवून काटा काढला अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

परळी येथील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर काल एका दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पीकअपने जोराची धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील संपत्ती बाबु पारवे हा 26 वर्षीय तरुण ठार झाला, तर निकम केरबा इंगळे हा तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Beed News)

दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या 6 तासात घातपाताचा पर्दाफाश केला केला आणि आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT