Beed Parli Bike Accident Saam TV
महाराष्ट्र

Beed Accident News : बीडच्या परळी शहरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Satish Daud

बीड जिल्ह्यातील परळी शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. जुन्या थर्मल पॉवर स्टेशनजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जब्बार सय्यद (वय 65 रा.बरकरत नगर परळी) आणि अजय चौधरी (रा. मुंबई) अशी अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.

दरम्यान दोन्ही मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी चालवत होते. जुन्या थर्मल पॉवर स्टेशनजवळ त्यांची समोरसमोर धडक झाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संगमनेर एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा अपघात

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा अपघात झाला. तालुक्यातील कोंची येथून रुग्णाला घेऊन संगमनेरकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू तर चालक आणि नातेवाईक जखमी झाले.

भंडाऱ्यात ट्रकचा भीषण अपघात, चालक गंभीर

भंडारा जिल्ह्यातील उसर्रा गावाजवळच उभ्या असलेल्या एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचालक गंभीर जखमी होऊन ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कॅबिनचा पत्रा कापून ट्रकचालकाला बाहेर काढण्यात आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT