Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ट्रॅव्हल्स चालकाचा गळफास; मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

Beed News : शहरातील जिल्हा परिषेद शाळेच्या आवारात असलेल्या झाडाला गडफेस घेतला होता. हि घटना सकाळी उघडकीस आली

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या आवारात एका खासगी ट्रॅव्हल्स चालकाने गळफास घेत जीवन संपविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेतल्याची चर्चा या घटनेनंतर परिसरात होत आहे. 

बीड (Beed News) शहरातील अंकुशनगर या परिसरातील रहिवासी अर्जुन कवठेकर असे गळफास घेतलेल्या तरुण ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. ते बीड येथील महाराजा या खासगी ट्रॅव्हाल्सवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील जिल्हा परिषेद शाळेच्या (Zp School) आवारात असलेल्या झाडाला गडफेस घेतला होता. हि घटना सकाळी उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. 

दरम्यान ट्रॅव्हल्स चालक अर्जुन कवठेकर याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या दृष्टीने बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT