Beed Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Beed Vidhan Sabha : बीड मतदारसंघाच्या तिकिटावरून शरद पवार गटात रस्सीखेच; तीन उमेदवार इच्छुक

Beed news : बीड विधानसभा मतदारसंघासाठी तिकिटावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे.

विनोद जिरे

बीड : राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने तिकिटाचा सस्पेन्स जैसे थे ठेवला आहे. या मतदारसंघातून तीनजण इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याची प्रतीक्षा आहे. 

बीड (Beed) विधानसभा मतदारसंघासाठी तिकिटावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र आता (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रवेश केला आहे. यामुळे आता बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये तिकिटावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बीडमधून संधी कोणाला?

बीड जिल्ह्यातील आष्टी आणि केज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आष्टीमधून राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तर केज विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बीड मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याने त्यामुळे आता तुतारीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ

Congress CEC Meeting: जागावाटपातील वाटाघाटीवर राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; CEC बैठकीत सुनावलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत शरद पवारच 'चाणक्य'; सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT