Sandeep Kshirsagar Saam tv
महाराष्ट्र

Beed News: शाळा सोडून निवडणुकीत शिक्षकांच्‍या दारू अन्‌ मटन पार्टी; राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप

शाळा सोडून निवडणुकीत शिक्षकांच्‍या दारू अन्‌ मटन पार्टी; राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये क्षीरसागर काका– पुतण्या आमने– सामने आले आहेत. बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण आदर्शसह चार शिक्षण संस्थामधील शिक्षक (Teacher) हे मुलांना शिकवायचे सोडून, ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीच्या प्रचाराचे काम करत आहेत. तसेच चिट्टी वाटणे व दारू, मटणाच्या पार्ट्या करत आहेत. असा गंभीर आरोप (NCP) राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. (Letest Marathi News)

बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका (Election News) जाहीर झाल्यापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना कामाला लावले आहे. शिक्षक हे शिकवण्याचे काम सोडून ग्रामपंचायतच्या प्रचारासाठी पूर्ण वेळ सक्रिय आहेत. नवगण आणि आदर्श शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचा निवडणुकीसाठी गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करत या संदर्भातील तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कारवाईची मागणी

दरम्यान हा विषय मी अधिवेशनात मांडणार असल्‍याचे सांगत आमदार संदीप क्षीरसागर यांनी या सर्व शिक्षकावर कारवाई केली जावी. अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT