Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: विद्युत मीटरमध्ये छेडछाड; 8 ग्राहकांवर गुन्हा दाखल

विद्युत मीटरमध्ये छेडछाड; 8 ग्राहकांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव शहरात वीज चोरीचे प्रकार वाढल्यामुळे वीज वितरण (MSEDCL) कंपनीने मीटरमधून होत असलेल्या चोरी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी मीटरिंग बॉक्स बसवले आहे. यामुळे (Beed News) मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Breaking Marathi News)

माजलगाव शहरात वीज वितरण कंपनीचे 8 हजार ग्राहक आहेत. यापैकी बहुतांश ग्राहक मीटरमध्ये छेडछाड किंवा बायपास करून वीज चोरत असतात. परिणामी वीज वितरण कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता विजेच्या खांबावर मीटरिंग बॉक्स बसवून वीजचोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

१३ ग्राहकांची वीजचोरी उघडकीस

मागील 8 दिवसांत 13 ग्राहकांकडून वीजचोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आले. त्यापैकी पाच जणांनी दंडासह रक्कम भरण्याचे मान्य केले. यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित 8 जणांवर माजलगाव शहर पोलिसात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT