Beed News Bus Service Stop Saam tv
महाराष्ट्र

Bus Service Stop : बीडमध्ये एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

Beed News : बीडमध्ये एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तिव्र होत चालले आहे. यात बीडमधून (Beed) पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस जाळण्यात आल्याची घटना रात्री समोर आली. यानंतर आज सकाळपासून एक देखील बस फेरी सोडण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

बीडमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. आंदोलकांनी शनिवारी रात्री धुळे- सोलापूर महामार्गावर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. तर त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून आहेर वडगाव फाट्यावर बीड- कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस (St Bus) जाळण्यात आली होती. त्याचबरोबर एका बसवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न देखील केला होता. यानंतर आता बीडमध्ये एसटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाले आहे.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठही आगार बंद 
रात्री बस पेटवून दिल्याने बीड बसस्थानकातून एकही बस बाहेर सोडली जात नाही. त्यामुळे अद्याप एकही बस फेरी झाली नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठही आगारातील बसफेऱ्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मात्र याविषयी एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी अजय मोरे यांच्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र सध्यातरी बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT