Manjra Dam Beed Saam tv
महाराष्ट्र

Beed News: मांजरा धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले; धुवाधार पावसाने बीड जलमय

मांजरा धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले; धुवाधार पावसाने बीड जलमय

विनोद जिरे

बीड : परतीच्‍या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजविला आहे. यात बीड जिल्‍ह्यात देखील मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. यामुळे बीडच्या मांजरा धरण (Manjara Dam) भरले आहे. या कारणाने धरणाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले असून यातून 8736.68 क्यूसेस प्रतिसेकंद वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Live Marathi News)

तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे (Beed) बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेता धरणाचे 6 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. धरणाचे 1, 3, 4, 6 हे दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर 2, 5 हे दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. दरम्यान या दरवाज्यावाटे 8736.68 क्यूसेस प्रतिसेकंद वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सतर्कतेचा इशारा

दरम्यान पाण्याची आवक पाहून धरणातील विसर्ग कमी अथवा वाढू शकतो. यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना व कालव्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुवाधार पावसाने बीड जलमय

बीड शहरासह जिल्ह्यामध्ये परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. बीड शहरात तब्बल 2 तास झालेल्या पावसाने शहरातील मुख्य महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे बीड शहर जलमय झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने, वाहनधारकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव, आष्टी, गेवराई यासह सर्व तालुक्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून होत असणाऱ्या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT