Beed Zp School Saam tv
महाराष्ट्र

Beed Zp School : माजलगावमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरली शाळा; शिक्षक नियुक्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक

Beed News : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा कमी पटसंख्येवर शाळा सुरु आहे. तर दुसरीकडे बहुतांश शाळांवर शिक्षकच नसल्याचे चित्र आहे.

विनोद जिरे

बीड : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या आता चिंतेचा विषय झाला आहे. शाळांवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशाच प्रकारे वाघोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज संतप्त ग्रामस्थांनी माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्यात आली. 

जिल्हा परिषद शाळांमध्ये (Zp School) विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा कमी पटसंख्येवर शाळा सुरु आहे. तर दुसरीकडे बहुतांश शाळांवर शिक्षकच नसल्याचे चित्र आहे. तर काही शाळा या एक- दोन शिक्षकांच्या भरोशावर चालविल्या जात आहेत. त्यानुसारच बीडच्या माजलगाव तालुक्यातील वाघोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांनी देखील अनेकदा (Teacher) शिक्षक नियुक्तीची मागणी करत आंदोलन केले आहे. तरी देखील येथे अद्याप शिक्षक मिळालेला नाही. 

वारंवार अर्ज विनंती करून देखील शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. याठिकाणी (Majalgaon) माजलगाव येथील गटशिक्षणाधिकारी कार्यलयात आल्यानंतर या ठिकाणीच विद्यार्थ्यांना बसवून शाळा भरवली आहे.  जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT