Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड जिल्ह्यात दुष्काळाची भयाण दाहकता; नदी- तलाव कोरडेठाक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर

Beed News : येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीड शहराला देखील पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक बिकट होण्याचे चिन्ह आहे

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली होती. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात आतापासून दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे.(Beed) जिल्ह्यातून वाहत असलेल्या नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे आल्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भयान होत चालली आहे. जिल्ह्यातील नदी, तलाव कोरडे ठाक पडले असून पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. तर माजलगाव तालुक्यासह बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव धरण देखील अवघ्या १० टक्क्यांवर आहे. नदी, तलावात पाणी नसल्याने विहीर व ट्यूबवेलचे पाण्याचे जहीर देखील कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बीड शहराला देखील पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिक बिकट होण्याचे चिन्ह आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

दुष्काळ सदृश्य चित्र असताना सरकार अन शासनाने बीड जिल्ह्यातील अकरापैकी अवघ्या ३ तालुक्यातच दुष्काळ जाहीर केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संकटात सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT