valu mafia saam tv
महाराष्ट्र

वाळू माफियांनी पोखरली नदी; पात्रात खोदले शेकडो खड्डे

वाळू माफियांनी पोखरली नदी; पात्रात खोदले शेकडो खड्डे

विनोद जिरे

बीड : जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. जिल्ह्यातील सिंदफणा आणि गोदावरी नदी पात्रात दहा ते पंधरा फुटांचे मोठमोठे खड्डे करून वाळू माफियांकडून वाळूचा सर्रास उपसा केला जातोय. (beed news Sand mafia ponds river Hundreds of pits dug into the container)

सिंदफणा नदी (Sindfana River) पात्रात वाळू उपशासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये बुडून, चार निष्पाप बालकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ही एकच घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडली नसून या अगोदरही राक्षसभुवन परिसरात गोदावरी नदीपात्रात (Godavari River) वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून, मुलींचा मृत्यू झाला होता. अशा एक ना अनेक घटना दररोज घडत आहेत, एवढेच नाही; तर आतापर्यंत एकट्या गेवराई तालुक्यात वाळू माफियांच्या भरधाव वाहनांनी 9 जणांचा चिरडून बळी गेलेला आहे. मात्र यावर प्रशासनाकडून अद्यापही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

नदीमध्‍येच वाळूचे ढीग

दुसरीकडे सिंदफणा नदीतील खड्ड्यात रविवारी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर याच सिंदफना नदीत खड्ड्यांचा खच पाहायला मिळालाय. ठिकठिकाणी दहा ते पंधरा फूटापर्यंतचे मोठमोठे खड्डे खोदून त्यामधून वाळू उपसा केला आहे. त्याचबरोबर या नदीमध्ये वाळूचे मोठमोठे ढिगारे देखील पाहायला आहेत. मात्र यावर हप्तेखोरीमूळ कारवाई केली जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. दरम्यान याच वाळू माफियांकडून सिंदफना नदी पात्रात कशाप्रकारे नंगानाच सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT