Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; 9 लाखांच्या रोकडीसह पाच तोळे सोने लांबविले

बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; 9 लाखांच्या रोकडीसह पाच तोळे सोने लांबविले

विनोद जिरे

बीड : बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांच्या कार्यालय आणि घरी धाडसी (Theft) दरोडा टाकून पती- पत्नीला मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने (Gold) चोरून नेले. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे. (Beed News Theft)

बीड (Beed) तालुक्यातील वडवाडी येथे बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचे घर व कार्यालय आहे. मध्यरात्री 8 ते 10 दरोडेखोरांनी अवचर यांच्या घरी व कार्यालयावर दरोडा टाकला. यावेळी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल 9 लाख रुपयांच्या रोकडीसह 5 तोळे सोने पळविले आहे.

घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती देताच नेकनूर पोलिसांसह (Police) एलसीबीच्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT