Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Beed News : बीडमध्ये बनावट नोटांची छपाई केली जात होती. घरात प्रिंटरच्या माध्यमातून हि छपाई केली जात होती.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये बनावट नोटा छपाई करणारे मोठे रॅकेट समोर आले आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फरार आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली. या दरम्यान बीड शहरात १४ ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत येथून साहित्य देखील जप्त केले आहे.

बीडमध्ये (Beed News) बनावट नोटांची छपाई केली जात होती. घरात प्रिंटरच्या माध्यमातून हि छपाई केली जात होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शहरातील वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या १४ ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान घराच्या दुसऱ्या मजल्यावर प्रिंटरच्या साह्याने नोटा छापत असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी लागणारा कागद हा बाहेर राज्यातून आणला जात होता. यामध्ये खूप मोठे धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी (Police) व्यक्त केली आहे.

घरात आढळले शस्त्र 
या प्रकरणात संशयीत आरोपी सनी आठवले, महेश आठवले व मनेश क्षीरसागर यांच्या घरी झाडाझउती घेतली असता चाकु, कुकरीसह घातक शस्त्र आढळून आले आहेत. बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे हे इतर राज्यात देखील असल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्श आढळून आले आहे. अशी माहिती बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी दिलीय. तसेच फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT