Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये भाजप नेत्याचे बंडखोरीचे संकेत; माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी

Beed News :बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर मोहन जगताप यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली

विनोद जिरे

बीड : येत्या विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याचा माझा निर्धार झाला आहे. मात्र पक्ष, झेंडा कोणता हे येत्या पाच तारखेला सांगतो अशी रोखठोक भूमिका माजलगाव मतदारसंघातील भाजप नेते मोहन जगताप यांनी घेतली आहे. यामुळे माजलगाव मतदारसंघातून बंडखोरीचे संकेत आपल्या बोलण्यातून दिले आहेत. 

बीड (Beed News) जिल्ह्यातील माजलगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर मोहन जगताप यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करून माजलगाव (Majalgaon) मतदारसंघात दुसऱ्यांनीच उमेदवारी मिळवली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पंकजा मुंडे यांचा तर पराभव झालाच, परंतु माजलगावमधून भाजपकडून उभा उमेदवाराचा देखील पराभव झाला. मात्र यावेळी मी माघार घेणार नाही. निवडणूक लढवणारच असल्याचे देखील मोहन जगताप यांनी म्हटले. 

आमदार सोळंके यांच्यावरही केली टीका 

यावेळी त्यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकाश सोळंके यांच्यावरही टीकास्त्र सोडले. आमदार हे बाहेरचे गुत्तेदार आणून टक्केवारी घेत आहेत. स्थानिकांना काम देत नाहीत. विकास कामात माजलगाव मतदारसंघ मागे पडला आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायला लागलो, तर त्यांना रस्त्यावर चालले मुश्किल होईल; असे देखील मोहन जगताप यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT