Ambajogai- Latur Highway Accident: Saamtv
महाराष्ट्र

Beed Accident: दुर्दैवी घटना! बीडमध्ये पिकअप- दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू; १ जखमी

Ambajogai- Latur Highway Accident: अंबाजोगाई- लातूर महामार्गावर मध्यरात्री पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला.

विनोद जिरे

Beed Accident: बीडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई- लातूर महामार्गावर मालवाहू पीकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या (Beed) अंबाजोगाई- लातूर महामार्गावर मध्यरात्री पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. महामार्गावरील लोखंडी सावरगाव परिसरात झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली.हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातातील दोघांची ओळख अद्याप पटलेली नसून अंबाजोगाई पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, रविवार(९ सप्टेंबर) ला बीड जिल्ह्यात दुसरी एक भीषण अपघाताची घटना घडली होती. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Professional Cuddler Job: मार्केटमध्ये आलाय नवीन जॉब, मिठी मारा अन् लाखो रूपये कमवा

Maharashtra News Live Update: तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीवरून नांदेडमध्ये आंदोलन

Actress Mother Death : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Belly Fat Loss: वाढलेला पोटाचा घेर पाण्यानेच होतो कमी? वॉटर फास्टिंग ट्रेंड नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT