बीड : गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या परळी शहरातील वीज ग्राहकाला 45 हजरांचा गंडा घातल्याचा घटना ताजी असतांना आता पुन्हा बीड शहरातील वीज ग्राहकाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्ही मागच्या महिन्याचे वीज बील भरलेले नाही. रात्री तुमची वीज खंडित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधा, असा मेसेज पाठवून त्यावर संपर्क करण्यास वीज ग्राहकास सांगितले. त्यानंतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वीज ग्राहकाच्या अकाऊंटमधून (Cyber Crime) दीड लाख रुपये काढून घेत गंडा घातला आहे. हा धक्कादायक प्रकार बीड शहरातील धोंडीपुरा भागात घडलाय. (beed news Pay the bill otherwise we will cut the electricity By sending fake message)
बीड (Beed) शहरातील धोंडीपुरा भागात राहणाऱ्या धनंजय भास्कर डोंगरे (वय 51) यांना 18 जूनला दुपारी 12 वाजता एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. त्यामध्ये तुम्ही मागच्या महिन्याचे (MSEDCL) बील भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री 9:30 वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे लिहीले होते. त्यावर विश्वास ठेवून धनंजय डोंगरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता मी महावितरणचा अधिकारी बोलत असून तुम्ही टीम व्ह्युअर अॅप्लीकेशन डाऊनलोड करा; असे सांगितले.
पासवर्ड सांगताच मिळविला मोबाईलच ॲक्सेस
त्याचा पासवर्ड डोंगरे यांनी संबंधिताला सांगताच त्याच्याकडे मोबाईलचे अॅक्सेस गेले. त्यानंतर त्याने डोंगरे यांच्या बँक अकाऊंटमधून तीन वेळेस 50 हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंगरे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वीज ग्राहकाला बनावट मॅसेज टाकून गंडा घातल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.