NCP Leader Ramkrishna Bangar Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरण, अजित पवार गटाच्या नेत्याला अटक

NCP Leader Ramkrishna Bangar Arrested: बीडच्या पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामकृष्ण बांगर यांना पोलिसांनी अटक केली. बाजार समितीतील घोटाळा प्रकरणी त्यांना वाशीम येथून अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधामध्ये पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा बाजार समितीच्या मालकीचा भूखंड, बेकायदेशीर रित्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी पाटोदा पोलिस ठाण्यात रामकृष्ण बांगर यांच्याविरोधात या गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्यांच्या शोधात होते. अखेर त्यांना पोलिसांना अटक केली.

रामकृष्ण बांगर यांच्यावर बाजार समितीच्या भूखंड प्रकरणाबरोबरच महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रामकृष्ण बांगर यांच्यासह तब्बल ४१ जणांवर हा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून रामकृष्ण बांगर हे फरार होते. त्यांच्या मागावर असलेल्या पथकाने वाशीम येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. सध्या ते पाटोदा पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस त्यांची चौकशी आणि पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT