Beed Mosque Explosion Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: 'शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार,भंगार नाय रं'; मशिदीमध्ये स्फोट करण्यापूर्वी आरोपीने बनवली रील

Beed Mosque Explosion: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यामधील अर्धामसला गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी स्फोट घडवून आणला. स्फोट घडवण्याआधी यांनी इंस्टाग्रामवर रील बनवली होती.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असलेल्या मशिदीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. गावातील दोन युवकांनीच मशिदीमध्ये जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला होता. पोलिसांनी स्फोट करण्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केलीय. यातील एक आरोपी विजय गव्हाणे याने स्फोट घडवण्याआधी इंस्टाग्रामवर रील बनवली होती. दरम्यान या स्फोट प्रकरणी पोलिसांनी श्रीराम सागडे नावाच्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.

गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील दोन युवकांनीच मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेत दोन आरोपींना तात्काळ अटक केली. वादातून या दोन आरोपींनी स्फोट घडवून आणाला. अर्धामसला गावात मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावातील दोन युवकांनी मशिदीमध्ये जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवला.

या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पहाटेच घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. स्फोट करण्याआधी गव्हाणेने इंस्टाग्रामवर 'शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार,भंगार नाय रं' असे बोल असलेल्या गाण्याची रील बनवली. या रीलमध्ये त्याने एका हातात जिलेटीन घेतले आहे. तर दुसऱ्या एका हातात पेटवलेली सिगारेट दिसत आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्राचे वीरेंद्र मिश्रा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केलीय. तलवाडा पोलीस ठाण्यात २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी तपासणी केली. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे, तर पोलिसांनी शांततेच आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT