Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: दारूच्या नशेसाठी बनला मोबाईल चोर; पोलिसांनी १७ मोबाईलसह घेतले ताब्यात

दारूच्या नशेसाठी बनला मोबाईल चोर; पोलिसांनी १७ मोबाईलसह घेतले ताब्यात

विनोद जिरे

बीड : व्यसन कधी कुणाला काय करायला लावेल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये (Beed) समोर आला. दारूची नशा करण्यासाठी पैसे नाहीत, मजुरी करायचे जीवावर यायचे. म्हणून एका युवकाने मोबाइल चोरी (Theft) करणे सुरू केले. आतापर्यंत अनेक महागडे मोबाइल हजार, पाचशे रुपयांना विक्री करून नशा भागवली. मात्र अखेर तो पोलिसांच्या नजरेत बसला अन १७ महागड्या (Mobile) मोबाईलसह या नशेखोर चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. (Live Marathi News)

सोहिल खान समद खान (रा.जुनी भाजी मंडई, बुंदेलपुरा, बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. सोहिल हा दारूच्या आहारी गेलेला आहे. दररोज त्याला दारू प्‍यायला लागते. दिवसभर काम करून नशा करायची हे त्‍याच्‍या अंगी नव्‍हते. सोप्‍या मार्गाने पैसे जमवून नशा करायची हा त्‍याचा नित्‍यनियम झाला होता. यामुळे दारूची नशा करायला पैसे नसल्याने तो मोबाइल चोरीकडे वळला.

अन्‌ तो पोलिसांच्‍या नजरेत आला

बीड शहरातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच एलसीबीला सोहिलची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून सोहिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ मोबाइलही जप्त केले असून सध्या त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT