Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : गांधिगिरी करत मनसेचे आंदोलन; कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीची केली पूजा

Beed News : गांधिगिरी करत मनसेचे आंदोलन; कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीची केली महापूजा

विनोद जिरे

बीड : सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने गांधीगिरी करत (Beed) अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीची महापूजा करत निषेध व्यक्त केला. (Live Marathi News)

बीडच्या आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीची महापूजा करण्यात आली. (Ashti) अर्धवट रस्ते व त्याचे बिल उचलणाऱ्या अधिकारी आणि गुत्तेदारावर कारवाई करावी; अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

अधिकारी आणि गुत्तेदारांनी संगनमताने कोट्यावधीची कामे कागदपत्रावर करून पैसे उचलले असल्याचा गंभीर आरोप  मनसेने केला आहे. तसेच तीन तालुक्यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील मनसेने केला. दरम्यान या संपूर्ण बोगस कामांची चौकशी करून अर्धवट रस्ते पूर्ण करावेत, अशी मागणी मनसे आंदोलकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार शहरात पुरणपोळी तयार करणाऱ्या लाडक्या बहिणींशी श्रीकांत शिंदेंनी साधला संवाद

भाताचे मंच्युरियन पाहून तोंडाला पाणी सुटेल

Accident Tragedy : ताम्हिणी घाटात थरार! अंधारात टॉयलेटला गेले, दरीचा अंदाज न आल्याने खोल दरीत कोसळले

TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार

Nashik Tourism: लोणावळा-खंडाळाही विसराल; पाऊस सुरू होण्यापूर्वी विकेंडला नाशिकच्या 'या' हिल स्टेशनवर मस्त फिरून या

SCROLL FOR NEXT