Sandip Kshirsagar Saam tv
महाराष्ट्र

Sandip Kshirsagar News : डोकं ठिकाणावर ठेवून कायदा बनवावा; आमदार संदीप क्षीरसागर यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Beed News : बीडमध्ये हिट अँड रन कायदा विरोधात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हजारो चालकांचा मोर्चा

विनोद जिरे

बीड : केंद्र सरकार कोणताही कायदा बनवताना डोकं ठिकाणावर ठेवून बनवत नाही, त्यामुळे केंद्र सरकारने डोकं (Beed) ठिकाणावर ठेवून कायदा बनवावा. या कायद्यामुळे केवळ वाहन चालकांनाच नाहीतर प्रत्येक व्यक्तीला याचा त्रास होणार असल्याचे सांगत आमदार संदीप क्षीरसागर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Live Marathi News)

बीडमध्ये हिट अँड रन कायदा विरोधात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हजारो चालकांचा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच (Hit And Run) कायद्यात बदल केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधिवेशनात प्रश्न मांडणार 

साधं दुचाकी धारकाकडून देखील अचानक नजर चुकीने अपघात झाला तर त्याला याचा त्रास होणार आहे. त्यामुळे २० कोटी चालकांनाच नाही; तर देशातील प्रत्येकाला याचा त्रास होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा देशभर आंदोलन होईल आणि आम्ही देखील येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर अधिवेशनात देखील याविषयी प्रश्न मांडू. असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलताना दिला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: उद्या बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचा पैसा आणि संपत्ती दुप्पटीने वाढणार

Makar Sankranti 2026: केवळ फॅशन म्हणून नाही तर का घालतात संक्रांतीला हलव्याचे दागिने? जाणून घ्या खरं कारण

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा शंखनाद! कधी आणि कोणती निवडणूक होणार? जाणून घ्या A टू Z माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई नेरुळमध्ये अडीच लाख रुपये जप्त; मतदारांच्या यादीसह एकाला ताब्यात

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

SCROLL FOR NEXT