Beed News Saam tv
महाराष्ट्र

डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमध्ये लाखोंचा गुटखा

डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमध्ये लाखोंचा गुटखा

विनोद जिरे

बीड : अवैध धंदा करण्यासाठी कोण, कधी, कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार बीडच्या संभाजीनगर पोलिसांनी उघडकीस आला. डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधुन लाखोंच्या गुटख्याची वाहतूक (Beed News) केली जात होती. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. आज पहाटे केलेल्या कारवाईत साडेदहा लाखाच्या गुटख्यासह 9 लाखाचे कंटेनर पोलीसांनी (Police) पकडले आहे. (beed news Millions of gutkhas in containers under the name of postal parcels)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून हरियाणा (Haryana) पासिंग असणारा कंटेनर (क्र. HR55 T-4271) घेऊन चालक परळी शहरात आला होता. या कंटेनरवर डाक पार्सल असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीवरून या कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गुटखा आढळून आला. दरम्यान आरोपी चालक सरफराज अहेमद दारुद (वय 35, रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड, हरीयाणा) यास ताब्यात घेत त्याच्यावर कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत कंटेनरमध्‍ये 28 मोठे बोरे आढळून आले. त्यामध्ये तब्बल 224 सुगंधी गुटख्याची पोटे मिळून आली आहेत. यात पोलिसांनी तब्बल 19 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT