Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan: बीडमध्ये मराठा बांधव आक्रमक; १५ गावातील नागरिकांचा दुचाकी मोर्चा

Beed News : बीडमध्ये मराठा बांधव आक्रमक; १५ गावातील नागरिकांचा दुचाकी मोर्चा

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे मराठा समाजाचे अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. या दरम्यान (Beed) बीडमध्ये मराठा बांधव (Maratha Aarkshan) आक्रमक झाले असून जिल्ह्यातील १५ गावांमधील मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर दुचाकी मोर्चा काढला. (Tajya Batmya)

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ गावातील मराठा बांधवांनी रामगड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढत मोर्चा काढला. या (Maratha Aarkshan) मोर्चात शेकडो मराठा समाज बांधव सहभागी होत शासनाचा निषेध केला. शिवाय मराठा आंदोलनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

आरक्षणासोबत या आहेत मागण्या 

मोर्चातून मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, कंत्राटी नोकर भरती तात्काळ थांबवा, अंतरवाली सराटी येथील आंदोलकावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, महिला भगीनीवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करा, मुख्यमंत्र्यांनी दिलेला चाळीस दिवसाचा शब्द पाळावा, बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा. या मागण्यांसाठी मराठा बांधवांनी आक्रमक होत मोर्चा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

SCROLL FOR NEXT