Beed News Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : सरकारची अंत्ययात्रा काढत केला अंत्यविधी; बीडच्या नांदूरमध्ये मराठा समाज आक्रमक

Beed News : सरकारची अंत्ययात्रा काढत केला अंत्यविधी; बीडच्या नांदूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात रोज एक नवे आंदोलन उभारले जात आहे. (Maratha Aarkshan) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. त्यानुसार बीडच्या (Beed) नांदूरमध्ये महाराष्ट्र सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली.  (Live Marathi News)

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात आले आहे. यात जालना येथे आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक आक्रमक झाले व संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटू लागले आहेत. याच दरम्यान बीडच्या नांदूरमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आज मराठा बांधवांनी सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही; म्हणून सरकारची अंत्ययात्रा काढत थेट अंत्यविधी केला आहे.

प्रतिकात्मक फोटोचा केला अंत्यविधी 
नांदूर गावातून विधीवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोची पूर्ण गावातून व बाजारातून अंत्यायात्रा काढली गेली. त्यानंतर गावाच्या बाहेर देवी मंदिर परिसरात अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT