Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Beed News : विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलीय. त्यानंतर आता ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यांनीच पचका करून ठेवला आहे. ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. आता मतदान करा, पण पाडापाडी करायची आहे; असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. 

विधानसभा निवडणुकीतील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलीय. त्यानंतर आता ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज पासून जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. तर यावेळी त्यांनी (Beed) पुन्हा एकदा मराठा बांधवांना आवाहन केले आहे. मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. 

राजकारणासाठी आरक्षण जायला नको 

मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो, दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते, टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून ही भूमिका घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. 


आजपासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानल आहे. समाज अडचणीत येऊ नये, म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल. तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT