Namdev Shastri saam tv
महाराष्ट्र

Namdev Shastri: 'मुंडेंना मंत्रिपद मिळू दे'; धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी नामदेव शास्त्रींची प्रार्थना

Beed News : सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा मुंडे प्रेम उफाळून आलंय.. मात्र महंत नामदेव शास्त्रींनी नेमकं काय म्हटलंय? आणि मुंडेंच्या मंत्रिपदासाठी काय अपेक्षा व्यक्त केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

ऐकलंत! सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानीयत समोर आली आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला... मात्र भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री अजूनही मुंडेंचीच काळजी वाहत असल्याचं समोर आलंय... नेमकं काय म्हणालेत नामदेव शास्त्री तुम्हीच ऐका.

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.. एवढंच नाही तर वाल्मिक कराड आणि मुंडेंचे संबंध जगजाहीर असतानाही नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची उघडपणे पाठराखण केली.

सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असल्याचं उघड झालं. त्यानंतर धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली जातेय. त्यानंतरही नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा पुळका का? धनंजय मुंडेंइतकीच नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाची चिंता वाहणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळेच नामदेव शास्त्रींनी राजकीय भूमिका घेण्याऐवजी समाजहिताची भूमिका घ्यायला हवी. नाहीतर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, असाच शिक्का शास्त्रींवर बसल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरात प्रकरणातील सर्व मंत्री-अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, कुणी लिहलं राष्ट्रपतींना पत्र

Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडची पुनरावृत्ती; फ्रिजमध्ये सापडले मोनिकाच्या शरिराचे तुकडे, पोलीस शिराच्या शोधात

Shocking : नात्याला काळिमा! काकानं लेकीसारख्या मुलीवर केला बलात्कार, निर्जनस्थळी केलं अमानुष कृत्य

Home loan tips: होम लोन घेण्यापूर्वी या बाबींचा विचार नक्की करा

Cancer Symptoms: भूक लागत नाही अन् वजन अचानक कमी होतंय? असू शकतात या कॅन्सरची लक्षणं, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT