Suresh Dhas Saam tv
महाराष्ट्र

Beed News: राजकीय षडयंत्रातून गोवण्याचा प्रयत्‍न, चौकशीला सामोरे जाणार; भाजप आमदार सुरेश धस

राजकीय षडयंत्रातून गोवण्याचा प्रयत्‍न, चौकशीला सामोरे जाणार; भाजप आमदार सुरेश धस

विनोद जिरे

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्यात (Land Scam Case) माझा आणि माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाही. हे राजकीय षडयंत्रातून मला गोवण्याचा प्रयत्न आहे. मात्र मी चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रीया (BJP) भाजपाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी दिली आहे. (Tajya Batmya)

आष्टी (Ashti) तालुक्यातील आठ हिंदू देवस्थानाच्या 212 हेक्टर जमीन घोटाळा प्रकरणात सुरेश धस यांच्यावर काल आष्टी पोलीस (Police) ठाण्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. यात आमदार सुरेश धस याच्यासह पत्नी व भाऊ याच्यावर यांचा समावेश आहे. यावर सुरेश धस यांनी मौन सोडत आज आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हिंदू देवस्थानच्या इनामी जमिनी संदर्भात कसलाही माझा संबंध नाही. या प्रकरणात राजकीय सूड भावनेतून ही कारवाई आहे, असे देखिल ते म्हणाले

लवकरच सत्‍य समोर

आमदार धस म्हणाले की, देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमीनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. निराधार तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र असुन पोलिसांच्या चौकशीला मी तयार असुन त्याना सहकार्य करणार आहे. लवकरच दुध का दुध व पाणी का पाणी होणार आहे.लोकसेवका विरोधात तक्रार आली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. पण तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर अस घडत असेल तर कोणत्याही लोकसेवकावर असे अस्त्र वापरले जाईल, असेही त्यांनी सांगीतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT