Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का; जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागरांना दिला जाहीर पाठिंबा

Beed News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीतील चुरस अधिक वाढत आहे.

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज अखेर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळं आमदार संदीप क्षीरसागर यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे. तसतशी निवडणुकीतील चुरस अधिक वाढत आहे. अर्थात माघार झाल्यानंतर काही ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असताना आजही अचानक मित्र पक्ष किंवा जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार (Beed News) बीडमध्ये देखील पाहण्यास मिळाले असून मतदानाला काही दिवस बाकी असतानाच काकाने पुतण्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात क्षीरसागर कुटुंबातील काका आणि दोन पुतण्याने उडी घेतली होती. मात्र काही कारणामुळे काका जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आणि आता महायुतीकडून योगेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबातील २ बंधू बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये आता क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. तर पाठिंब्याने योगेश क्षीरसागर यांचे पारडे अधिक जड झाले आहे. यामुळे आता या 2024 च्या निवडणुकीमध्ये गुलाल कोण उधळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT