Beed Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Beed Vidhan Sabha : बीडमध्ये शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी समोर; उमेदवारी कोणाला? पक्षप्रमुखासमोर असणार आव्हान

Beed News : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक मतदार संघात चाचपणी करत पक्षांकडून दावा ठोकला जात आहे.

विनोद जिरे

बीड : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता सर्वच पक्षाकडून जागा वाटप आणि उमेदवारी कोणाला? यासाठीची आखणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून शिंदे गटाने दावा केला आहे. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याने पक्ष प्रमुखांसमोर उमेदवारी देण्याचे आव्हान राहणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक मतदार संघात चाचपणी करत पक्षांकडून दावा ठोकला जात आहे. दरम्यान बीड मतदारसंघात शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे नाव अग्रस्थानी असून मीच (Beed) बीड विधानसभेचा उमेदवार असेल, त्याची तयारी देखील सुरू आहे; असं अनिल जगताप यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून काम पाहणारे बाजीराव चव्हाण देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन देखील केले आहे.

अजित पवार गटाकडूनही दावेदारी 
दरम्यान महायुतीकडून अजित पवार गट आणि शिंदे गट या दोघांकडूनही बीड विधानसभेवर दावा केला जातोय. मात्र महायुतीच्या चर्चेअंती बीडची जागा कोणाकडे जाते हे ठरेल. तसेच पक्षापुढे नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला? याचे आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT