Ashti Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Ashti Heavy Rain : आष्टी तालुक्यात धुवाधार पाऊस; सीना नदीच्या पुराचे पाणी शिरले गावात, शेती पिकाचे मोठे नुकसान

Beed News : अवकाळी पाऊस राज्यात जोरदार बरसत आहे. परिणामी अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यानुसारच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात धो धो बरसला आहे. यामुळे तालुक्यातील सिना नदीला मोठा पूर आला असून पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये देखील शिरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून युवा नेते जयदत्त धस यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

अवकाळी पाऊस राज्यात जोरदार बरसत आहे. परिणामी अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. बहुतांश नद्यांना पूर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसारच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे तालुक्यातील सीना नदीला मोठा पूर आला आहे. नदी काठावरील साकत, खुंटेफळ, लोणी, कोयाळ या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. 

नदी पात्र फुटून पुराचे पाणी शेतात 

शिवाय नदीवरील बंधाऱ्यामधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने नदी पात्र फुटून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. यामुळे शेतात असलेला कांदा, ऊस, मका व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतांचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून, काही भागांत विहिरी पाण्यात बुजल्या आहेत. तसेच सोलर पंप व कांद्याच्या चाळी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला मुरघासही या पाण्यात मिसळला असून अंदाजे दीडशे ते दोनशे टन मुरघास वाया गेला आहे.

तातडीने पंचनाम्याची मागणी 
पुराची माहिती मिळताच युवा नेते जयदत्त धस यांनी तातडीने प्रशासनाला सोबत घेत पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तर साकत हे गाव अहिल्यानगर- सोलापूर हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून या गावाचा मिरजगाव व अहिल्यानगर शहराशी दळणवळणाचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र, पुरामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. याबाबत जयदत्त धस यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्ता पुनर्बांधणीसाठी आवश्यक कार्यवाहीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT