Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; वाऱ्याने प्रचंड नुकसान

Beed News : बीड जिल्ह्यात गेल्या ७ दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती. बीडमधील तापमानाचा पारा ४३ डिग्री सेल्सिअस वर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते.

विनोद जिरे


बीड : वाढलेल्या तापमानात वातावरणात अचानक बदल होऊन दुपारच्या सुमारास बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लागली. या दरम्यान नवगण राजुरी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे हॉटेलच्या खुर्च्या उडाल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच नागरिकांची देखील पळापळ सुरु झाली होती. 

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या ७ दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती. बीडमधील तापमानाचा पारा ४३ डिग्री सेल्सिअस वर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. एकीकडे पाण्याचा तीव्र दुष्काळ असताना दुसरीकडे तापमानाचा (Temperature) पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच उष्णतेचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. 

बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी परिसरात सुसाट वाऱ्यासह अर्धा तास पाऊस (Rain) झाला. या अवकाळी पावसाने नागरिकांना उष्णता व उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे जोरदार वारा असल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ठिबकसाठी शेतात अंथरलेल्या नळ्या देखील उडून गोळा झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : वाद-विवादापासून लांब राहा, ८ राशींवर स्वामींची कृपा राहणार; वाचा आजचे राशीभविष्य

Jarange Patil: 'एकतर मी जाईन, नाहीतर सरकार...'; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

SCROLL FOR NEXT