Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : वडिलांवर कर्जाचा बोजा; २५ वर्षीय शेतकरी पुत्राचे टोकाचे पाऊल

वडिलांवर कर्जाचा बोजा; २५ वर्षीय शेतकरी पुत्राचे टोकाचे पाऊल

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात शेतकऱ्याने कालचं आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका शेतकरी पुत्राने (Beed) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २५ वर्षीय शेतकरी (Farmer) पुत्राने वडिलांकडे असलेल्या कर्जाच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. (Live Marathi News)

बीड जिल्‍ह्यातील केजच्या आंधळेवाडीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष दैवान आंधळे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. मयत संतोष याने घरी कुणी नसतांना राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. शेतकरी कुटुंबातील संतोष हा वडिलांवर असलेल्या कर्जामुळे निराश होता. कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतूनच त्याने गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.

सलग दुसऱ्या दिवशी आत्‍महत्‍या

दरम्यान बीड जिल्ह्यात कालच शेतकरी यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, आज शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि कुटुंब नैराश्यात जगत असल्याचं समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Store Eggs: फ्रिजमध्ये अंडी ठेवण्याची योग्य जागा कोणती? दारात की आतल्या कप्प्यात?

Maharashtra News Live Update: राजस्थानमध्ये नाशिकच्या बागलाण मधील भाविकांचा भीषण अपघात!

Rat Control Tips : उंदरांचा सुळसुळाट झालाय का? न मारता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या

EPFO Rules: निवृत्तीनंतर PF वर व्याज मिळतं की नाही? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

CNG Hike : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सीएनजी महागला; आजचे ताजे दर किती? वाचा

SCROLL FOR NEXT