Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : शेतकऱ्याने प्रशासनाला पाडलं उघडं; केंद्रीय पथकासमोर गाऱ्हाणं मांडलं, जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला बोलावलं

Beed News : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहे. या पथकासमोर शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं मांडण्यास सुरवात केली.

विनोद जिरे

बीड : दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्यांचा पाढा वाचत बीड (Beed) जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत उघड पाडलंय. पिण्यासाठी पाणी नाही, पीक हातचं गेलं, रेशन वेळेवर मिळतं नाही, रोजगार हमीच काम नाही, पीएम किसानचा लाभ नाही; असं गऱ्हाण मांडताच जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला बोलवा, असं म्हणत वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यभर फिरत आहे. हे केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहे. या पथकासमोर शेतकऱ्यांनी (Farmer) आपली गाऱ्हाणी मांडण्यास सुरवात केली. आपली गाऱ्हाणी मांडताना शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी देखील हजार होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पथकाकडून महामार्गालगतच पाहणी 

केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावर देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला की पाहणी फक्त महामार्गाच्या लगतच केली जात असून याची खरी वस्तुस्थिती पहायची असेल प्रत्यक्ष शेतात या. अशी पाहणी केली तर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाच नाही असं देखील शेतकरी म्हणत आहे. दरम्यान आलिशान गाड्यांचा मोठा ताफा दौऱ्यावर लाखोंचा खर्च, मात्र या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा खरंच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार का? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Color Care: केसांना केलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT