Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Beed News: धक्कादायक..सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन स्टिकफास्टने केले बंद; मतदान रोखण्याचा अजब फंडा

धक्कादायक..सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन स्टिकफास्ट टाकून केले बंद; मतदान रोखण्याचा अजब फंडा

विनोद जिरे

बीड : ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड (Beed) तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आले. यामुळे मतदान (Election News) तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Live Marathi News)

बीड (Beed News) तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील (EVM) ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.

गावात गोंधळ

सदर प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला? याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali Accident : सांगलीत एसटी बस आणि कंटेनरची भीषण धडक; देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांचा अपघात

Godavari River Flood : गोदावरी नदीला पूर; गंगामसला गावात पुराचे पाणी, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली

Goa Vibes Mumbai : मुंबईत गोवा! गोराई बीचवर पांढरी वाळू, सीफूड आणि फेरी राइड One Day Tripचा अनुभव

सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Rain Live News: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

SCROLL FOR NEXT