Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती माहिती, धाड टाकल्यानंतर दृश्य बघून धक्काच बसला

वन्यप्राण्याची वाळत ठेवलेली कातडी

विनोद जिरे

बीड : बीडच्या कोळकानडी येथे बांधकाम सुरू असलेल्या घरावर वन्यप्राण्याची हळद, मिठ लावून वाळत ठेवलेली कातडी सापडली. हा धक्कादायक प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे (Beed News) सापडल्याने उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (beed news Dry skin of a wild animal found on the wall)

अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील कोळकानडी गावात नविन बांधकाम सुरू आहे. त्या बांधकाम असलेल्या भिंतीवर, हाळद, मिठ लावून वन्य प्राण्याची कातडी वाळत टाकली असल्‍याची गोपनीय माहिती अंबाजोगाई (Police) ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या अधारे पोलीस व वन विभागाने संयुक्तरित्या कार्यवाही करून कातडी ताब्यात घेतली. औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत कातडीचे काही अंश तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महत्वाचा निर्णय! ऊस गाळप हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून, VIDEO

Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

SCROLL FOR NEXT