Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed: ...अन् जिल्हा शल्यचिकित्सकच म्हणतात चुना आहे का चुना? काय आहे नेमकं प्रकरण?

डॉक्टर साबळे यांच्या अनोख्या पॅटर्नची जिल्हा रुग्णालयासह गावखेड्यात चर्चा

विनोद जिरे

बीड - जिल्हा रुग्णालयात असलेल्या, जिल्हा शल्य चिकित्सकांनी, चक्क रुग्णांच्या नातेवाईकांना तंबाखू खाण्याची खून दर्शवत चुना आहे का ? विचारलं. हे ऐकून आपणही थोडसं विचारात पडला असाल. मात्र हा चुना तंबाखू खाण्यासाठी नाही तर रुग्णालयात तंबाखू खाण्यावर निर्बंध आणण्यासाठी विचारला आहे.

बीडचे (Beed) जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी, एखाद्या आजारी व्यक्तीकडून होणारा संसर्ग रोखावा आणि रुग्णालयात व्यसन केलं जाऊ नये. यासाठी व्यसनमुक्ती करण्याचा जणूकाही प्रणच घेतला आहे. डॉक्टर साबळे हे दिवसातून दोन वेळा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करतात. विशेष म्हणजे या दरम्यान ते नातेवाईकांसह रुग्णालयातील पुरुष रुग्णांची तपासणी देखील करतात. यावेळी गुटखा, तंबाखू, मावा यासारखे अमली पदार्थ असतील तर ते जप्त करत पुन्हा खाऊ नका म्हणून तंबी देखील देतात. अन्यथा दंड केला जाईल असंही सूनवतात.

हे देखील पाहा -

विशेष म्हणजे काही नागरिक हे आमच्या खिशात काहीच नाही, असं सांगून आपल्या खिशातील तंबाखू, गुटखा देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे यावर रामबाण उपाय म्हणून डॉक्टर साबळे हे तुमच्याकडे तंबाखू, गुटखा, चुना काही आहे का ? हे विचारण्याऐवजी कधीकधी "तंबाखू खाण्याची खून दर्शवत तुमच्याकडे चुना आहे का " ? असं विचारतात. यामुळे एखाद्या व्यक्तीने चून्याची डब्बी दिली, तर तात्काळ त्याच्याकडील तंबाखू आणि गुटख्यासारखे साहित्य देखील काढून घेतले जाते.

दरम्यान यामुळे डॉक्टर सुरेश साबळे यांची जिल्हा रुग्णालयातच नाही तर ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांमुळे गाव खेड्यात देखील एक अनोखी चर्चा रंगू लागलीय. यामुळं डॉक्टर साबळेंच्या या अनोख्या व्यसनमुक्तीच्या पॅटर्नमुळे, काहीसा संसर्ग आणि काही व्यक्तींचे व्यसन कमी होऊ शकतात ! असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामुळे डॉक्टर साबळे यांचा आदर्श राज्यातील इतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील घ्यावा. जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याला मेडिसिन न घेता फायदा होऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, CM देवेंद्र फडणवीस परवानगीबाबत स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: सांगली: विट्यात ४२ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT