महाराष्ट्र

Dhananjay Munde: 'मुलं माझी पण ती पत्नी नाही'; धनंजय मुंडेंचा कोर्टात युक्तीवाद

Dhananjay Munde Karuna Munde Marriage: धनंजय मुंडे आणि करुणा शर्माच्या लग्नावरुन कोर्टात महाभारत रंगलंय.मात्र कोर्टात नेमका काय युक्तीवाद झाला आणि करुणा यांच्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय .वांद्रे कोर्टाने दिलेल्या 2 लाखांच्या पोटगीच्या आंतरिम निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलंय. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात चांगलीच खडाजंगी झाली.करुणा शर्मापासून झालेली मुलं माझी आहेत पण करुणा शर्मांशी अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय. करुणा मुंडेंनीही त्यावर जोरदार प्रतिवाद केलाय.

मुंडेंच्या वकिलाचा युक्तीवाद - धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नाही

न्यायाधीशांचा सवाल- करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण?

मुंडेंचे वकील- मुंडेंनी मुलांना स्वीकारलं आहे, पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही

करुणा शर्मांचे वकील- आमच्याकडे लग्नाचे पुरावे

कोर्टाचा सवाल- मुलं तुमची आहेत मग करुणा त्यांच्या आई कशा नाहीत?

मुंडेंचा वकील- करुणा शर्मांकडे कोट्यावधींची संपत्ती, तरी पोटगीसाठी अर्ज

करुणा शर्मांचे वकील- आम्ही पुरावे देतो, आम्हाला 5 एप्रिलपर्यंत वेळ द्या.

न्यायाधीश- पुढील सुनावणी 5 एप्रिलला होईल

कोर्टातील युक्तीवादानंतर करुणा शर्मांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढलाय. धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंपासून झालेल्या मुलांची नावं टाकली आहेत.. मात्र करुणा मुंडेंचा पत्नी असा उल्लेख टाळलाय. त्यामुळे करुणा मुंडे आता इरेला पेटल्या असून त्या धनंजय मुंडेंसोबतच्या लग्नाचे पुरावे देणार आहेत. जर करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले तर थेट धनंजय मुंडेची आमदारकीच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नावरूनच सुरू झालेला हा कौटुंबिक वाद नेमकं काय वळण घेणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT