Toll Plaza Saam tv
महाराष्ट्र

Toll Plaza : फास्टटॅग व्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची मागणी; बीड जिल्ह्यातील वैद्यकीन्ही टोल नाक्यावरील प्रकार, वाहनधारक व कर्मचाऱ्यात वाद

Beed News: प्रत्येक टोलनाक्यावर वाहनांप्रमाणे तोल निश्चित करण्यात आला आहे. शिवाय फास्टटॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. त्यानुसार फास्टटॅग मधून पैसे कटल्यानंतरही कर्मचारी मुजोरीची भाषा करत गाडी सोडत नव्हते

विनोद जिरे

बीड : टोल नाक्यावरील बेकायदेशीर वसुली केल्यावरून वाहनधारक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात (Beed) चांगलाच वाद झाल्याचा  प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. (Ahmednagar) अहमदनगर- अहमदपूर या राष्ट्रोय महामार्गावरील पाटोदा तालुक्यात वैद्यकिन्ही टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. (Maharashtra News)

प्रत्येक टोलनाक्यावर वाहनांप्रमाणे तोल निश्चित करण्यात आला आहे. शिवाय (Fastag) फास्टटॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. त्यानुसार फास्टटॅग मधून पैसे कटल्यानंतरही कर्मचारी मुजोरीची भाषा करत गाडी सोडत नव्हते म्हणून वाद पेटला. तसेच यावेळी या (Toll Plaza) टोलनाक्यावर अवजड वाहन धारकाकडून बोगस पावत्या देऊन वसुली केला जात असल्याचा आरोप देखील वाहन धारकांनी केला आहे. या लुटीच्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार करणार असल्याचे देखील सांगितलं..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाकडूनच मागितले जास्तीचे पैसे 
विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राहुल चौरे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यावेळी त्यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र यावेळी अरे तुरीची भाषा करत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. जर ही लूट थांबली नाही तर टोल नका फोडू; असा इशाराही राहुल चौरे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT