Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : महिला रुग्णाचा मृत्यू; नातलग संतप्त, डॉक्टरांवर गंभीर आरोप, मृतदेह २ तास रुग्णालयात ठेवला

Beed News : बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचॆ घटना घडली आहे. मात्र हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला

विनोद जिरे

बीड : बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे कारण देत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आणून ठेवला. तब्बल दोन तास हा मृतदेह दालनात ठेवत गोंधळ घातला. 

बीडच्या (Beed) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचॆ घटना घडली आहे. मात्र हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रेखा गायकवाड असं मृत महिलेचे नाव असून विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. 

डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी 

संतप्त नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आणून ठेवला. तब्बल दोन तास या ठिकाणी नातेवाईकांचा गोंधळ सुरू होता. दरम्यान जोपर्यंत संबंधित डॉक्टरांच निलंबन केलं जात नाही; तोपर्यंत या ठिकाणाहून मृतदेह हलविला जाणार नाही. असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र कारवाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी सदरील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT