Remdesivir Vaccine Saam tv
महाराष्ट्र

Beed News: कोरोनात ज्या लसीसाठी वशिला लावला, जादा पैसे मोजले; तेच इंजेक्शन एक्सपायर

Remdesivir Vaccine: साडेपाच हजार इंजेक्‍शन नष्‍ट करणार

विनोद जिरे

बीड : कोरोनाची दुसरी लाट संकंटाची होती. प्रत्‍येकाला जीव वाचवायचा प्रयत्‍न सुरू होता. यात कोरोनाची (Corona) लागण झाल्‍यानंतर ऑक्‍सीजनची कमतरता भासत होती. याच दरम्‍यान प्रभावी मानले जात असलेले रेमडीसिवरची (Remdesivir) लस मिळणे कठीण होते. यामुळे वशिला लावत ब्‍लॅकमध्‍ये ही लस खरेदी करत होते. परंतु, आता हीच लस एक्सपायर झाले आहे. (Letest Marathi News)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडिसिवर इंजेक्शन प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. यामुळे या दरम्यान तुटवडा जाणवल्याने रेमडिसिविर इंजेक्शनसाठी अनेकांनी वशिले लावले. काही लोकांनी अधिकाऱ्यांच्या घरासमोर रात्र जागवली होती. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने या इंजेक्शनची मागणीही घटली. आता ही लस पडून आहे.

साडेपाच हजार इंजेक्‍शन नष्‍ट करणार

राज्य शासनाने बीड (Beed) जिल्हा रुग्णालयाला दिलेले ५ हजार ५७० रेमडिसीवर इंजेक्शन एक्सपायर झाले आहेत. मागणी नसल्‍याने शासनाने पुरविलेले बीड जिल्हा रुग्णालयातील तब्बल ५ हजार ५७० इंजेक्शन एक्सपायर झाले आहेत. तर जे इंजेक्शन एक्सपायर झाले आहेत, ते नष्ट करण्याची कारवाई पुढील आठवडाभरात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान यामुळं शासनाचे काहीसे नुकसान देखील होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

Maharashtra Politics : आमची लोक वाघाची शिकार करायची, आता...; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT