Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: भाजप आमदाराच्‍या जाहीर प्रचार सभेत गोंधळ; भाजप– उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

भाजप आमदाराच्‍या जाहीर प्रचार सभेत गोंधळ; भाजप– उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील (Beed) रुई गावात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या आयोजित केलेल्या जाहीर सभेत गोंधळ उडाला. आक्षेपहार्य विधान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. (Maharashtra News)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत आमदार लक्ष्मण पवार यांनी आक्षेपहार्य विधान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे शिवसेना (Shiv Sena) गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामुळे भाजप (BJP) कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तर यावेळी ग्रामस्थांनी देखील आमदार पवार यांना घेराव घालत, मोठा गोंधळ करत सभा उधळून लावल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी एका पोलीस (Police) अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ केल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसात तक्रार नाही

या घटनेची माहिती कळताचं पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी अन्‌ कर्मचारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत रुई गावात तळ ठोकून उभे होते. घटना घडूनही दोन्ही गटाकडून अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही. मात्र बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गावात गोंधळ घालत आचारसंहिता भंग करत शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT