Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage: दहावीतील मुलीचा लावला विवाह; आई– वडीलांसह १८३ जणांवर गुन्हा दाखल

पेपराच्‍या दिवशी दहावीतील मुलाचा बालविवाह; आई– वडीलांसह १८३ जणांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहने डोकं वर काढले आहे. दहावी वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह (Child Marriage) आज तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या (Beed News) परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे. तर याप्रकरणी (Parali) परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल १८३ जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरून परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका १६ वर्षीय मुलीचा गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला.

बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना या विवाहासंदर्भात माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासकीय यंत्रणा नंदागौळला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.

१८३ जणांवर गुन्‍हा दाखल

परळी येथे झालेल्‍या बालविवाह प्रकरणी आता मुला– मुलीच्या आई- वडीलांसह मामा- मामी, भटजी, फोटोग्राफर, मंडपवाला, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणाऱ्या तब्बल १८३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोली नगर परिषदेचा अनागोंदी कारभार उघड, 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

Wednesday Horoscope : काही तरी मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT